रुग्णांसाठी सोपे व उपयुक्त मार्गदर्शन — मराठी व इंग्रजीमध्ये.
Simple, doctor-recommended advice — in English and Marathi — to help you stay comfortable and recover well.
You can usually go home the same day and resume light activities. Mild soreness at the injection site is normal for a day or two. Follow the exercises and medicines advised, and avoid very heavy work for a few days.
उपचारानंतर त्याच दिवशी घरी जाता येते; इंजेक्शनच्या जागी थोडा त्रास सामान्य आहे. सांगितलेले व्यायाम व औषधे घ्या.
Keep the limb elevated to reduce swelling, keep the plaster/dressing dry, and move your fingers or toes regularly. Come for your follow-up and X-ray as advised, and start physiotherapy when your surgeon recommends.
सूज कमी होण्यासाठी हात/पाय उंच ठेवा; प्लास्टर कोरडे ठेवा; बोटे हलवत राहा; ठरलेल्या तारखेला तपासणीसाठी या.
Follow the physiotherapy plan closely — early, guided movement is key to a good recovery. Use any walking aid as advised, avoid sitting on the floor initially, and keep your follow-up appointments.
फिजिओथेरपीचे काटेकोर पालन करा; सांगितल्याप्रमाणे चालण्याचा आधार वापरा; सुरुवातीला जमिनीवर बसणे टाळा.
Contact us if you have increasing pain, high fever, excessive swelling, bleeding, or any wound that is not healing. It is always better to check early.
वाढती वेदना, ताप, जास्त सूज, रक्तस्राव किंवा न भरणारी जखम असल्यास लगेच संपर्क करा.
This guide is for general information only and does not replace your doctor's advice. For any concern, please contact us. ही माहिती केवळ सामान्य मार्गदर्शनासाठी आहे; डॉक्टरांच्या सल्ल्याची जागा घेत नाही.
Simple exercises demonstrated by our team for neck and back pain relief. मानदुखी व कंबरदुखीसाठी सोपे व्यायाम.
Detailed guides in Marathi on common bone & joint problems, written by our doctors. खालील विषयावर क्लिक करून सविस्तर माहिती वाचा.
ओझोन थेरपी म्हणजे काय? ओझोन थेरपी ही एक प्रगत वैद्यकीय उपचार पद्धती आहे, ज्यामध्ये ओझोन वायूचा (O₃) वापर करून शरीरातील आजार बरे केले जातात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवली जाते.
ओझोन थेरपीचे प्रमुख फायदे:
या आजारांवर अत्यंत गुणकारी: मधुमेह व डायबेटिक फूट जखमा · सांधेदुखी (गुडघेदुखी, कंबरदुखी) · दमा व श्वसनाचे विकार · अशक्तपणा आणि थकवा · कर्करोग उपचारांनंतरचे पूरक उपचार (केमोथेरपीचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी).
ओझोन थेरपीच का निवडावी? कोणतेही मोठे दुष्परिणाम नाहीत · नैसर्गिक आणि सुरक्षित उपचार पद्धती · जुनाट आजारांवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यास मदत. "औषधांवर अवलंबून राहण्यापेक्षा, शरीराच्या नैसर्गिक उपचार शक्तीला ओझोनच्या मदतीने जागृत करा!"
गुडघ्याच्या सांध्यातील झिजेप्रमाणे खुब्याच्या सांध्याचीही झीज होते — यास खुब्याचा संधिवात किंवा हीप ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतात. सांध्याचे आवरण खराब झाल्याने वेदना होणे, सांधा घट्ट होणे, हालचाली मर्यादित होणे अशी लक्षणे दिसतात.
शस्त्रक्रियेनंतरची संभाव्य गुंतागुंत: जंतुसंसर्ग, सांधा निसटणे, पायाची लांबी कमी-जास्त होणे इत्यादींची शक्यता असते — त्यामुळे तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार महत्त्वाचे.
संधिवात ठरवण्यासाठी खालील सात पैकी चार लक्षणे असणे आवश्यक आहे:
स्टिरॉइड्सबाबत सावधान: सततच्या स्टिरॉइड वापरामुळे हाडांची घनता कमी होणे, खुब्यातील हाडांची झीज असे दुष्परिणाम होतात. अचानक तीव्र सूज-वेदना असतानाच तात्पुरती स्टिरॉइड्स वापरली जातात; कायमस्वरूपी वापर टाळावा.
या रुग्णालयातील उपचार: ओझोन व हायड्रोजन थेरपी — हायड्रोजन थेरपीमुळे सूज व वेदना कमी होतात; ओझोन थेरपीमुळे सांध्यातील पेशींना रक्त व ऑक्सिजन पुरवठा वाढून रुग्ण जलद बरा होतो. सोबत मुखर्जी रेजीम — व्हिटॅमिन डी, ई, फॉलिक ॲसिड, बी-१२, कॅल्शियम, प्रोटीन सप्लिमेंट अत्यंत कमी डोसमध्ये एक दिवसाआड; दर महिन्याला तपासणी करून डोस कमी-जास्त केला जातो.
मनगटाजवळच्या फ्रॅक्चरचा शोध सर अब्राहम कॉलेज यांनी लावला, म्हणून त्यास कोलीज फ्रॅक्चर म्हणतात. बहुतांश वेळा उतरत्या वयात हाडे ठिसूळ असल्याने, पडताना हात टेकल्यावर शरीराचा भार मनगटावर येऊन हे फ्रॅक्चर होते.
लक्षणे: मनगटाला सूज येणे · वेदना होणे · हालचाल न होणे · मनगट वेडेवाकडे दिसणे.
निदान: क्ष-किरण तपासणीत मनगटाजवळ हाड मोडून सरकलेले दिसते.
उपचार: आधुनिक भूल पद्धतींमुळे फक्त हातापुरती भूल देऊन हाड बसवून प्लास्टर केले जाते. हाडांचा ठिसूळपणा कमी करण्यासाठी कॅल्शियम, व्हिटॅमिन डी व गरजेनुसार टेरीपेराटाइड हार्मोन इंजेक्शन दिली जातात. साधारण दीड-दोन महिन्यांत हाड जुळून रुग्ण पूर्वीची कामे करू शकतो.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार सुमारे ६१९ दशलक्ष लोक कंबरदुखीने ग्रासलेले आहेत — जगभरातील अपंगत्वाचे हे प्रमुख कारण आहे. आधुनिक एमआरआय/सिटीस्कॅन तपासण्यांमुळे आता अचूक निदान होऊन योग्य उपचार शक्य आहेत; बोन-सेटर्ससारखे अघोरी उपाय टाळावेत.
मणक्यांची रचना: मानेचे ७, पाठीचे १२, कमरेचे ५ मणके व माकडहाड मिळून पाठीचा कणा बनतो. दोन मणक्यांमध्ये चकती (डिस्क) शॉक-ॲब्सॉर्बरचे काम करते. चकतीची झीज होऊन ती मागे सरकली की नसांवर दाब येऊन वेदना सुरू होतात.
लक्षणे: कंबरेतून पायापर्यंत चमकणारी वेदना, पायात मुंग्या/बधिरता — यास सायटिका म्हणतात. लघवी थांबणे, पायाची ताकद कमी होणे ही कोडा-इक्विना सिंड्रोमची गंभीर लक्षणे — त्वरित उपचार आवश्यक.
कारणे: १) चकतीची झीज / स्लिप डिस्क २) स्पॉन्डिलोलिस्थेसिस (मणका पुढे सरकणे) ३) बांबू स्पाईन (Ankylosing Spondylitis) ४) मणक्यांचा टीबी ५) ऑस्टिओपोरोसिस.
उपचार:
AVN (अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस) म्हणजे खुब्यातील हाडाचा रक्तपुरवठा कमी होऊन हाड मृत होत जाणे. यामुळे खुब्यात वेदना, सांधा घट्ट होणे व हालचाली मर्यादित होतात.
फ्रॅक्चर उपचारानंतर हाडांच्या टोकांमध्ये स्थिरता नसेल आणि पुरेसा रक्तपुरवठा नसेल तर हाडे जुळून येत नाहीत. खालील कारणेही यास कारणीभूत ठरतात:
निदान व उपचार: क्ष-किरण, सिटीस्कॅन, एमआरआय तपासणीद्वारे निदान. बोन ग्राफ्टिंग — शरीराच्या दुसऱ्या भागातील हाड फ्रॅक्चरच्या गॅपमध्ये बसवले जाते; सोबत स्थिरतेसाठी इंटर्नल/एक्स्टर्नल फिक्सेटर वापरून शस्त्रक्रिया केली जाते.
६५ वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी नितंबाचे फ्रॅक्चर अतिशय गंभीर असते. भारतात २५ कोटी नागरिक पन्नाशीच्या पुढील असून ऑस्टिओपोरोसिसने ग्रस्त आहेत — किरकोळ पडण्यानेही या वयात फ्रॅक्चर होते.
वृद्धांमध्ये पडण्याची कारणे: शरीराचे बिघडलेले संतुलन · ठिसूळ हाडे व कमकुवत स्नायू · हालचालींवरील बंधने · दृष्टी अंधुक असणे · काठी/वॉकर न वापरण्याची सवय.
उपचार: हाडांची टोके एकत्र असतील तर पेन ब्लॉक इंजेक्शनच्या साहाय्याने शस्त्रक्रियेशिवाय वेदना कमी करून वॉकरवर चालण्याची आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे. टोके जास्त हलली असतील तर रॉड व स्क्रूच्या साहाय्याने शस्त्रक्रिया केली जाते. सोबत कॅल्शियम, व्हिटॅमिन डी दिले जाते.
फ्रॅक्चर टाळण्यासाठी: दररोज थोडा व्यायाम · तज्ज्ञांच्या सल्ल्याने कॅल्शियम-व्हिटॅमिन डी · घरात अडगळ काढून बाथरूम घसरडे न ठेवणे · डोळ्यांच्या विकारांवर वेळीच उपचार.
गुडघेदुखीची प्रमुख कारणे: वयानुसार होणारी झीज (ऑस्टिओआर्थरायटिस) · कुर्च्यांना (मेनिस्कस) इजा · संधिवात · संसर्ग · लिगामेंट तुटणे · सांध्यातील फ्रॅक्चर · सांधा निसटणे · गाठ/टीबी · आवरणाचा खरबरीतपणा.
तपासण्या: रक्त चाचण्या, क्ष-किरण; मेनिस्कस/लिगामेंटसाठी एमआरआय; फ्रॅक्चरसाठी सिटीस्कॅन. आर्थ्रोस्कोपी — छोट्या दुर्बिणीद्वारे विना-टाके निदान व उपचार; अडकलेले तुकडे काढता येतात व रुग्णास लगेच घरी सोडता येते.
उपचार:
प्रतिबंध: नियमित व्यायाम · वजन नियंत्रण · दुखत असताना मांडी घालून बसणे, सतत जिने चढ-उतार टाळणे.
दंडाचे गोलाकार हाड खांद्याच्या वाटीतून सटकले तर खांद्याचा सांधा निखळला असे म्हणतात. एकदा निखळला की सांधा अस्थिर होऊन पुन्हा-पुन्हा निखळण्याची शक्यता जास्त असते.
लक्षणे: सूज · व्यंग दिसणे · हालचालीस अडथळा · तीव्र वेदना · खांदा जागेवरून सरकलेला दिसणे.
त्वरित काय करावे: खांद्याची हालचाल टाळावी, आहे त्या स्थितीत आधार देऊन बांधावा व बर्फाने शेकावे; तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.
कारणे: खेळांतील इजा (क्रिकेट, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स) · उंचावरून पडणे · काही रुग्णांत नैसर्गिकरीत्या सैल लिगामेंट्स.
निदान व उपचार: तपासणी, एक्स-रे व एमआरआय. निखळलेला सांधा विनाभूल सोप्या पद्धतीने बसवला जातो; उशीर झाल्यास शस्त्रक्रिया लागते. वारंवार निखळणाऱ्या खांद्यासाठी आर्थ्रोस्कोपी शस्त्रक्रियेने आवरण दुरुस्त केले जाते. घट्ट झालेल्या खांद्यासाठी ओझोन-हायड्रोजन थेरपी व व्यायाम सांगितले जातात.
टाचदुखी लहानांपासून वृद्धांपर्यंत आढळणारे दुखणे आहे. टाचेचे हाड वाढणे, प्लांटर फेशियाला सूज, युरिक ॲसिड वाढणे ही प्रमुख कारणे. दिवसभर उभे राहून काम करणाऱ्यांना (कंडक्टर, शिक्षक, मजूर) हा त्रास जास्त होतो.
प्लांटर फेशिया हा पायाच्या तळाखालून जाणारा लवचिक पट्टा टाचेच्या हाडाला इतर हाडांशी जोडतो व शॉक-ॲब्सॉर्बर म्हणून काम करतो. त्यास सूज आल्यास सकाळची पहिली काही पावले चालताना असह्य कळ येते. दुर्लक्ष केल्यास टाचेच्या हाडाला काट्यासारखी वाढ (कॅल्केनिअल स्पर) होते.
उपचार: दुखणाऱ्या टाचेला विश्रांती · पोटरी व तळव्याचे स्ट्रेचिंग व्यायाम · मऊ, आधार देणारे शूज · वजन कमी करणे. या उपायांनी बरे न झाल्यास पेन ब्लॉक व ओझोन इंजेक्शन दिले जाते — ज्यामुळे टाचदुखी त्वरित बरी होते.
हाताच्या पंजाला मुंग्या येणे, बधिरता किंवा पकडीची ताकद कमी होणे — ही कार्पल टनेल सिंड्रोमची लक्षणे असू शकतात. मनगटातील मीडियन नर्व्हवर दाब पडल्याने ही समस्या उद्भवते; रात्री/सकाळी लक्षणे जास्त जाणवतात.
कारणे: सतत एकसारखी हालचाल (उदा. अति टायपिंग) · मधुमेह, हायपोथायरॉईड, संधिवात, लठ्ठपणा · काही स्त्रियांमध्ये प्रसूतीनंतर.
निदान: मनगटाच्या विशिष्ट हालचाली व EMG-NCV चाचणीद्वारे.
उपचार:
जन्मजात हातापायांचे व्यंग (पाय आत वळलेले, उंची कमी), उपचारानंतर वाकडी जुळलेली हाडे, न जुळलेली हाडे, सांधे आखडणे, पोलिओ/सेरेब्रल पाल्सीमुळे आलेले अपंगत्व — या सर्वांवर आधुनिक डिफॉर्मिटी करेक्शन पद्धतींनी मात करता येते.
क्ष-किरण तपासण्या करून व्यंग दुरुस्तीचे नियोजन केले जाते. वाकडी जुळलेली हाडे कट करून रॉड किंवा स्क्रू-प्लेटच्या साहाय्याने सरळ केली जातात.
इलिझारोव्ह पद्धती: रशियातील डॉ. इलिझारोव्ह यांनी शोधलेल्या या पद्धतीत शरीराची चिरफाड न करता १.५–१.८ मिमीच्या तारा हाडांमध्ये फिक्स करून पायाबाहेर रिंगांची फ्रेम बसवली जाते. न जुळलेली/वाकडी हाडे इच्छित कोनात जुळवता येतात; शस्त्रक्रियेनंतर रुग्ण लगेच चालू-फिरू शकतो. जन्मजात किंवा अपघातामुळे उंची कमी असल्यास उंचीही वाढवता येते.
भारतात डॉ. बी. बी. जोशी यांनी तयार केलेला जोशी फिक्सेटरही कमी खर्चाची व प्रभावी पद्धत आहे. रुग्णाचे वय, व्यंगाचा कालावधी व तपासण्यांचा अभ्यास करून योग्य उपचार प्रणाली निवडली जाते.
क्लबफूट (जन्मजात टॅलिप्स इक्विनोव्हारस) हा जन्मतः आढळणारा सामान्य दोष आहे, ज्यामध्ये बाळाचा पाय आतल्या व खालच्या दिशेने वळलेला असतो. योग्य उपचारांनी क्लबफूट असलेली बहुतांश मुले धावणे, खेळणे यासारखे पूर्ण सामान्य जीवन जगू शकतात.
कारणे: बहुतांश प्रकरणे कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय (इडिओपॅथिक) · अनुवांशिकता · गरोदरपणातील धूम्रपान, संसर्ग, कुपोषण · क्वचित स्पायना बिफिडा/सेरेब्रल पाल्सीसारख्या आजाराचा भाग. गरोदरपणात पालकांच्या चुकीमुळे हे क्वचितच घडते.
पॉन्सेटी पद्धत (उपचारांची सर्वोत्तम पद्धत) — जन्मानंतर लगेच सुरू केल्यास यशाचा दर ९०% पेक्षा जास्त:
मोठ्या मुलांमध्ये शस्त्रक्रिया: निदान उशिरा झाल्यास किंवा पाय पुन्हा वाकडा होत असल्यास — टेंडन ट्रान्सफर · सॉफ्ट टिश्यू रिलीज · ऑस्टिओटॉमी (हाडांची शस्त्रक्रिया) · अत्यंत गुंतागुंतीच्या व्यंगांसाठी इलिझारोव्हसारखे एक्स्टर्नल फिक्सेशन.
पालकांसाठी सूचना: या उपचारासाठी संयम आवश्यक असतो — विशेषतः ब्रेसिंगच्या वर्षांमध्ये. तुमचे समर्पण तुमच्या मुलाला मोठे झाल्यावर व्यवस्थित चालण्यास व वेदनारहित जीवन जगण्यास नक्की मदत करेल!
Our team is always here to help. Reach us on WhatsApp or call — we will guide you through every step of your recovery.